‘त्या’ जळीत कारप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

फेब्रुवारी 17, 2022 10:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथील जुन्या पोलिस लाईन जवळ अवैधरीत्या वाहनात गॅस भरताना कार पेटल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून गॅस भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११२ क्रमांकावर कॉल करून नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवली होती.

4 wheeler on fire

पोलिस मिलिंद भामरे व सुनील पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौकशी केली असता अनिल सुरेश चौधरी हा अवैधरीत्या ओम्नी वाहनामध्ये गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. यात विनोद जानकीराम पारधी हे जखमी झाले.

चौकशी केली असता अनिल सुरेश चौधरी हा जय बिजासन माता स्वीट मार्टमध्ये अवैधरीत्या गॅस सिलिंडर बाळगून चारचाकी वाहनांमध्ये रिफिलिंग करत असल्याचे समोर आले. त्यामुळे अमळनेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now