जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । एरंडोल येथे फकीर वाड्यातील अवघ्या तीन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या मुनिरा बी शेख शाहरुख (वय १९) वर्ष या नवविवाहितेने घराच्या पंख्याला ओढणी चा गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास पोलीस करत आहे.

भावी संसाराची मधुर स्वप्ने डोळ्यात असलेल्या या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना एरंडोल येथे घडली असून, आत्महत्या केलेली नवविवाहित मुनिरा बी इचे माहेर जळगाव येथील असून एरंडोल येथील फकीर वाड्यातील बांधकाम मिस्तरी म्हणून काम करणाऱ्या शेख शाहरुख याच्याशी अवघ्या तीन महिन्यापूर्वी विवाह झाला याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नसीम शेख सलीम यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. तिच्या आत्महत्या मागचे कारण अजून अस्पष्ट आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील व छाया खैरे हे पुढील तपास करीत आहेत.
हे देखील वाचा:
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू










