जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । तुम्ही जर राज्य शासनाचे निवृत्त वेतन धारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. जळगाव कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे 70 वर्षे वयावरील निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक तसेच इतर राज्याचे 70 वर्षे वयावरील शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतन धारक यांना दिनांक 1 ते 28 फेबुवारी, 2022 या काळात आपण मूळ निवृत्तीवेतन तसेच पती/पत्नी यांची पुढीलप्रमाणे तपशिल – नाव, संपर्क क्रमांक, बँक, ब्रांच , खाते नंबर इ. एका कागदावर नमूद करुन यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक प्रथम पानाची छायांकित प्रत जोडून जिल्हा कोषागार कार्यालय जळगाव येथे कार्यालयीन वेळेत आणून जमा करावे.

ज्यांना शक्य नाही त्यांनी कार्यालयाच्या [email protected] या ई-मेलवर अथवा इतर व्यक्तीकडे पाठवून द्यावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श.वा. निकुम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हे देखील वाचा :
- प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
- ‘गोवंशाची कत्तल केली’ म्हणत ५ लाखांची मागणी; चोपड्याच्या दोघा तोतया पत्रकारांवर गुन्हा
- जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार? वाचा हवामान अंदाज
- जळगाव जिल्ह्यातील 31,908 शेतकरी कर्जमुक्त होणार; 184 कोटींची रक्कम जमा











