जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । देशाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन Union Budget 2022 सादर करत आहेत. तरुणांसाठीही यंदा केंद्राने मोठी घोषणा केली असून देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच स्टार्टअपसाठी नाबार्डच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

२०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इतक नाही तर पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३० लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं.

स्टार्टअपकडे तरुणांचा कल वाढत असून नवनवीन संकल्पना घेऊन तरुण, युवा पुढे येत आहेत. स्टार्टअपला प्राधान्य देण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करण्यात येईल असे देखील निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
हे देखील वाचा :
- धावपळ थांबणार, कामे झटपट होणार! निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲप विकसित
- सणासुदीपूर्वीच फोडणी महागली! जळगावात खाद्यतेलाचे दर भडकले; पाहा सध्याचे ताजे भाव
- अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले! भारत सरकारचा इंधनाबाबत मोठा निर्णय
- रेल्वे तिकीट कॅन्सलेशनचे नियम बदलले; ‘या’ वेळेनंतर १ रुपयाही रिफंड मिळणार नाही, वाचा नवे नियम?..
- एकदा चार्ज करा अन् १०६ किमी फिरा; यामाहाची प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; किंमत किती?











