जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । सावदा येथून जवळ असलेल्या थोरगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन प्रकाश मोरे यांना अपात्र घोषित करण्यात आले. असे आदेश उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी २४ रोजी दिले. याबाबत जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे सात ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केली होती.

थोरगव्हाण येथील सरपंच सचिन मोरे व ग्रामसेवक यांनी नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ या ग्रामपंचायतीच्या सलग दोन मासिक सभा न घेतल्याने येथील ग्रा.पं. सदस्य राजेंद्र चंद्रकांत चौधरी, कविता संदीप चौधरी, सुरेखा रामदास कोलते, उज्वला यशवंत बाउस्कर, सचिन नंदकुमार चौधरी, सुपडू दोधू मोरे, आशा सुपडू मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारींवर निकाल देताना ग्रामपंचायतीच्या सलग दोन मासिक सभा न घेतल्याने सचिन मोरे यांना थोरगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कायम राहण्यास महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम १९५९ चे कलम ३६ अन्वये अपात्र घोषित करण्यात येत असल्याचे आदेश २४ रोजी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी दिले.

हे देखील वाचा :
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!







