Breaking ! ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका! भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले रद्द

फेब्रुवारी 17, 2022 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या 12 निलंबित आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने अनिश्चित काळासाठीची स्थगिती घटनाबाह्य आणि मनमानी ठरवून रद्द केली.

court

वास्तविक, गेल्या वर्षी जुलैमध्ये महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. हे आमदार ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ गदारोळ करत होते. गदारोळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केलं होतं. या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमच्यावर सूड भावनेने कारवाई केल्याचं म्हटलं होतं.

आमच्यावर अन्याय झाल्याचंही भाजप आमदारांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना आमदारांचं निलंबन करण्याचा अधिकार हा विधानसभेचा आहे. तो त्यांच्या कार्यकक्षेचा भाग असल्याचं म्हटलं होतं. दोन वेळा या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज अखेर निर्णय आला आहे.

केवळ एका सत्रासाठी निलंबित केले जाऊ शकते
ज्या अधिवेशनात गदारोळ झाला त्या अधिवेशनासाठीच आमदारांचे निलंबन केले जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. याआधी सुप्रीम कोर्टानेही मागच्या सुनावणीदरम्यान टीकास्त्र सोडले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय लोकशाहीलाच धोका नसून तर्कहीन असल्याचे म्हटले होते.

या आमदारांचं निलंबन
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती विधानसभेत दिली होती.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now