जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । स्थानिक विकास निधी अंतर्गत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ५० लक्ष रुपायांचा ऑक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आ.किशोर पाटील यांचे हस्ते २६ रोजी सकाळी १०:०० वाजता येथील ग्रामीण रुग्णालयात होणार आहे.

माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे हे प्रमुख अतिथी राहणार आहेत.

नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्यास कोरोनाचे नियम पाळून उपस्थिती देण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
- पाण्याची चिंता काहीशी मिटली! जळगाव जिल्ह्यातील हे ७ प्रकल्प तुडुंब
- जळगावच्या बाजार समितीत मूग आणि उडदाला मिळाला ‘इतका’ भाव?
- ठाकरे गटाच्या त्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर ; वाचा काय म्हणाले..
- जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची CISF च्या DIG पदी नियुक्ती
- ऊन, उकाडा अन् सायंकाळी पाऊस ! जळगावात पुढचे ५ दिवस असे राहणार हवामान






