जळगाव शहर

मरणाच्या दारातून आईला परत आणणारी ‘शिवांगी काळे’ प्रधानमंत्री बाल पुरस्काराने सन्मानित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -२०२२ ची घोषणा करण्यात आली असून यात जळगाव येथील सहा वर्षीय शिवांगी काळे हीच समावेश आहे. शिवांगी हिने आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविले होते. यामुळे या चिमुकलीला ‘वीरता श्रेणी’मध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे दिली. यात जळगाव येथील शिवांगी काळे या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. या वर्षी एकूण 29 मुलांची राष्ट्रीय बाल पुरस्कार-2022 साठी निवड झाली आहे, तर गेल्या वर्षी ही संख्या 32 होती.

शिवांगीने तिच्या आईचे प्राण वाचविले. की घटना ५ जानेवारी २०२१ रोजी घडली. तिची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडले. बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या बहिणीसह होती. या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र शिवांगीने प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले. यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले. यामुळे आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तिला गौरविण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button