जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । सावदा येथील अन्नपूर्णा नगरातील रहिवासी प्रा.पी.पी.चौधरी व प्रा.संध्या चौधरी यांची दोन्ही मुले कपिल आणि ज्ञानेश या दोघा भावांनी आजारी अवस्थेतील कोकिळ पक्षाला जीवदान दिले.

दोघा भावंडांच्या घरासमोरील गटारीत किकोळ पक्षी सुस्त पडल्याचे त्यांना दिसून आले. जवळ जाऊन त्यांनी पाहिले असता तो पक्षी आजारी असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी पक्षाला गटारीतून बाहेर काढले. दोघांनी कोकिळेला घरी आणून सुरक्षित कापडाने झाकले. दोन्ही भावंडे त्या पक्षाची काळजी घेत आहेत. सध्या आजारी असलेला कोकिळ पक्षी काहीही खात नाही. त्यामुळे पक्षीमित्रांनी या पक्ष्याबाबत भावंडांना मार्गदर्शन करावे.

हे देखील वाचा :
- पाण्याची चिंता काहीशी मिटली! जळगाव जिल्ह्यातील हे ७ प्रकल्प तुडुंब
- जळगावच्या बाजार समितीत मूग आणि उडदाला मिळाला ‘इतका’ भाव?
- ठाकरे गटाच्या त्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर ; वाचा काय म्हणाले..
- जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची CISF च्या DIG पदी नियुक्ती
- ऊन, उकाडा अन् सायंकाळी पाऊस ! जळगावात पुढचे ५ दिवस असे राहणार हवामान






