जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । पाचोरा जंक्शन स्टेशन वर सुपरफास्ट गाड्यांना थांबासह पीजे रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसह विविध समस्यांचे निवेदन रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कॉंग्रेस कडुन देण्यात आले.

रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचा बनोटी येथे दौरा असताना हे निवेदन कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार, अमजद मौलाना व रवी पाथरवट उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा जंक्शन असुन पाचोरा ते जामनेर पीजे ही दोन तालुक्यातील जिव्हाळा निर्माण करणारी गाडी कोरोनाच्या नावाखाली बंद केली. पाचोरासह सोयगाव, पारोळा, भडगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यातील जनतेला ये जा करावे लागते. त्यामुळे विदर्भ एक्सप्रेस, अमरावती मुंबई एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, बॅग्लोर अहमदाबाद एक्सप्रेस, ओकाया रामेश्वर एक्सप्रेस, जबलपुर मुंबई गरीब रथ, पंजाब मेल यांना थांबा देण्यात यावा यासह भुसावळ-मुंबई पॅसेंजर, भुसावळ देवलाली शटल सुरू करुन अप-डाउन करणार्यांना तात्काळ मासिक व त्रमासिक पास द्यावी. यासह बनोटी ते पाचोरा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी संबंधित विभागांना शिफारस करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
हे देखील वाचा :
- पाण्याची चिंता काहीशी मिटली! जळगाव जिल्ह्यातील हे ७ प्रकल्प तुडुंब
- जळगावच्या बाजार समितीत मूग आणि उडदाला मिळाला ‘इतका’ भाव?
- ठाकरे गटाच्या त्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर ; वाचा काय म्हणाले..
- जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची CISF च्या DIG पदी नियुक्ती
- ऊन, उकाडा अन् सायंकाळी पाऊस ! जळगावात पुढचे ५ दिवस असे राहणार हवामान






