जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात बैठकीचे आयाेजन केले होते. त्यात उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा संघटनांची जिल्हानिहाय बैठक घेण्यात आली. जळगावचा आढावा घेण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील संघटनेचे कामकाज, फ्रंटल संघटना आणि सेलच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक आयाेजित केली हाेती. जिल्हा प्रमुखांकडून उपस्थित केलेल्या विषयांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीदरम्यान कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अविनाश आदिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित हाेते.

हे देखील वाचा :
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






