गुन्हेजळगाव जिल्हाभुसावळ

शालेय परिसरात गुटखा विक्री; ५ जणांवर गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । भुसावळात शालेय परिसरात १०० मीटरच्या आत गुटखा, तंंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली. बाजारपेठ पोलिसांनी तीन, तर शहर पोलिसांनी दोन जणांवर गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान ही कारवाई केली. या कारवाईत १६ हजार ९२२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी आहे. तरीही शहरात हा नियम खुंटीवर टांगून ठेवला जातो. याबाबत माहिती मिळताच डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे, पाेलिस निरीक्षक दिलीप भागवत, पाेलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने विविध शाळांबाहेरील विक्रेत्यांवर कारवाई केली. यात नाहाटा चौफुलीजवळ शेखर राजेंद्र वाणी यांच्याकडे ५,४४९ रूपयांचा माल जप्त केला. अतुल कुमावत या पाेलिस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. मामाजी टाॅकीज रोडवरील घासीलाल वडेवाल्याच्या बाजूला तुलसीदास मार्केटमधील ओमसार्स ट्रेडर्समधून ८,६०० गुटखा जप्त केला.

तिसरी कारवाई शहरातील जामनेर रोडवरील म्युनिसिपल हायस्कूलजवळ मामा पान काॅर्नरवर झाली. तेथून २,८७३ रूपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी लिलाधर भारंबे यांच्याविरुद्ध याेगेश माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पाेलिसांनी तिन्ही कारवाईत १६ हजार ९२२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button