जिल्ह्यात ‘लंपी’चा शिरकाव : अमोल जावळेंचे पत्र, सीएम कार्यालयाचे निर्देश

ऑगस्ट 6, 2022 9:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या पशुधनावर लंपी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येत आहे. आता पर्यंत या रोगामुळे संपूर्ण देशभरात हजारो जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे.आता जळगांव जिल्ह्यातील यावल,रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनच्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे.

lumpy skin jpg webp

जळगांव जिल्ह्यातील चिनावल (ता. रावेर) परिसरात तर गेल्या चार दिवसात पाच जनावरे मृत्युमुखी पडल्याने शेतकरी धास्तावले आहे. मुख्यत्वे हा एक संसर्गजन्य रोग असून, तो प्राण्यांनमध्ये जलद गतीने पसरणारा आजार आहे. यात प्रामुख्याने जनावरांच्या शरीरावर गुद्या येणे, ताप येणे,शरीरावर सूज येणे,चारा न खाणे या प्रकारचे लक्षण दिसून येतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावत असून या मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या या रोगाचा प्रादुर्भाव जळगांव जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यात यावल ,रावेर या तालुक्यातील काही ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यात जनावरे दगावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे.

यामुळे या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर लंपी आजाराचे इंन्फेकशन कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत लवकरात लवकर उपाययोजना कराव्या व योग्य ते नियोजन करून जनावरांचे लसीकरण तातडीने करावे अशा प्रकारची मागणी स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे अमोल हरीभाऊ जावळे यांनी केली आहे.त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने उपाययोजनांचे निर्देश दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now