जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । घर बांधण्यासाठी माहेराहून पाच लाख रूपये आणावे अशी मागणी करीत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मोहिनी तुषार बेंडाळे (रा. ज्ञानदेवनगर) यांचे लग्न खेडी येथील तुषार ज्ञानदेव बेंडाळे यांच्यासोबत झाले. पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी मोहिनीचा शारिरीक, मानसिक छळ केला. या प्रकरणी मोहिनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती तुषार ज्ञानदेव बेंडाळे, सासरे ज्ञानदेव नामदेव बेंडाळे, नणंद कुमुदिनी जगदीश कोल्हे व दीर प्रवीण बेंडाळे या चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






