जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । शहराच्या महामार्गावरील अजिंठा चाैफुली अपघाताचे माहेरघर झाली असून, परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे त्यात भर पडली आहे. चाैकातून चारही दिशांना माेठ्या प्रमाणात वाहतूक हाेते. त्यामुळे ३०० मीटर अंतरापर्यंत वाहन पार्किंगला बंदी घालावी, अशी मागणी महापाैर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अजिंठा चौकातून मध्य प्रदेश, औरंगाबाद, धुळे, मुंबईसाठी रस्त्याची विभागणी होते. या परिसरात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची दाट वस्ती आहे. त्यामुळे वाहनांसह नागरिकांची वर्दळ असते. त्यात काही लोक रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करतात. त्यामुळे या चौफुलीवर अपघात होतात. अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. या चौफुलीच्या ३०० मीटर परिसरात चारही बाजूला अवजड वाहने पार्किंगला रस्ते वाहतूक सुरक्षा समितीच्या माध्यमातून तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी महापाैर महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हे देखील वाचा :
- पाण्याची चिंता काहीशी मिटली! जळगाव जिल्ह्यातील हे ७ प्रकल्प तुडुंब
- जळगावच्या बाजार समितीत मूग आणि उडदाला मिळाला ‘इतका’ भाव?
- ठाकरे गटाच्या त्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर ; वाचा काय म्हणाले..
- जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची CISF च्या DIG पदी नियुक्ती
- ऊन, उकाडा अन् सायंकाळी पाऊस ! जळगावात पुढचे ५ दिवस असे राहणार हवामान






