जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । रावेर तालुक्यातील मस्कावद येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर प्रकार असा की, रावेर तालुक्यातील मस्कावद येथील 15 वर्षीय मुलगी सध्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून मुलगी व तिचे कुटुंबिय हे मध्यप्रदेशातील खंडवा येथील रहिवासी आहेत. कामाच्या निमित्ताने ते मस्कावद परीसरात राहतात. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता सर्वजण घरात झोपलेले असता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार ११ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. या प्रकरणी कुटुंबीयाच्या फिर्यादीवरून सावदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.

हे देखील वाचा :
- चाळीसगावात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात, 16.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पाचोऱ्यातील फूल विक्रेत्याला लावला तब्बल २३ लाखांचा गंडा ; अशी झाली फसवणूक?
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद






