जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२, लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ६ तसेच यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत १ जागा जिंकत दमदार कामगिरी करणाऱ्या बच्चुकडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जल्लोष पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जळगावात साजरा केला.

राज्यमंत्री बच्चुकडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला व अपंग आदी शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आहे. पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत सुध्दा १७ पैकी ६ जागा जिंकून मराठवाड्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. पक्षाचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष-बल्लू जवंजाळ, बुलडाणा जिल्हा प्रमुख-वैभवराजे मोहिते, पक्ष निरिक्षक-गजानन लोखंडकार यांनी विशेष संघटन बांधणी केली.

जळगाव शहरात प्रहार जनशक्ती युवक आघाडीचे शहराध्यक्ष निलेश बोरा, सागर गवळी, लक्ष्मण पाटील, हरीश कुमावत, जितेंद्र वाणी, धनंजय आढाव, अनिल बिऱ्हाडे,समाधान पवार, गोपीचंद मराठे, गणेश माळी, मो.इकबाल काकर, अभिजित बाविस्कर, ॲड. प्रदीप जी.सोनवणे, दिलीप शिंपी, समीर सोनवणे, हरीश अंभुरे, राजू पाटील, योगेश देशमुख, कमलाकर इंगळे, मोहन माळी आदी कार्यकर्त्यांनी पेढे भरवून पक्षाच्या यशाचा जल्लोष साजरा केला. यावेळी आगामी जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे करून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निर्धार व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा :
- सोने-चांदी खरेदीदारांसाठी गुड न्यूज! जळगावात आज दोन्ही धातूंचे दर घसरले
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






