जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । यावल येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बेशुद्धावस्थेतील जखमी गायीवर तरूणांच्या पुढाकाराने उपचार झाले. नंतर गायीला गोशाळेत पाठवण्यात आले. असून, तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे गायीला जीवदान मिळाले. या तरुणांच्या पुढाकाराचे शहारत कौतुक होत आहे.

शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. मोकाट गुरांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. काहीवेळा या गुरांना वाहनांची धडक बसते. अशाच एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गाय गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत ही गाय फैजपूर रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे व्यासनगरात बेशुद्धावस्थेत पडून होती. बबलू येवले, श्रीयुक्त वाणी या युवकांचे लक्ष गायीकडे गेले. त्यांनी डॉ. विवेक अडकमोल यांना याबाबत माहिती दिली. डॉ.अडकमोल यांनी गायीवर मोफत उपचार केले. त्यामुळे गायीची प्रकृती सुधारल्याने गायीला राहुल कोळी, हर्षल ठाकरे या तरूणांच्या पुढाकाराने अंजाळे येथील गोशाळेत पाठवण्यात आले.

हे देखील वाचा :
- आधी अधिकारी, आता कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू! यावल कृषी कार्यालयावर पुन्हा शोककळा
- यावलचा मुख्य रस्ता होणार चकाचक; ६.५० किमी काँक्रीटीकरणाचा शुभारंभ
- केळी चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला ठोकल्या मुसक्या, १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
- डांभुर्णीत हवेत गोळीबार करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गावठी पिस्तुलासह काडतूस जप्त
- ‘खाकी’चा रुबाब पडला भारी! हायकोर्टाचा दणका बसताच फरार पोलीस शिपायाची शरणागती






