जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील थोरगव्हाण ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी ज्योती केवल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

जातीचे वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थोरगव्हाणचे लोकनियुक्त सरपंच उमेश सोनवणे यांना अपात्र केले आहे. तेव्हापासून येथील सरपंच पद रिक्त होते. या रिक्त जागेवर उपसरपंच ज्योती पाटील यांची प्रभारी सरपंचपदी निवड करण्यात आली. ग्रामसेविका कविता बाविस्कर यांनी सभेला सुरुवात करुन अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले. ग्रामपंचायत सदस्य गोपाल चौधरी, हिरालाल चौधरी, अनिल भालेराव, पद्माबाई पाटील, मनोहर पाटील, सिद्धुबाई पाटील, यशोदाबाई भालेराव, मथुराबाई पाटील उपस्थित होते.











