जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । धरणगाव शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी बंद घर फोडल्याची घटना नुकतीच उघड झाली. ते दोघेही घरमालक बाहेरगावी गेले होते. दोन्ही घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दोन्ही घरांमधून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
शहरातील राजपूत मंगल कार्यालयाजवळील रहिवासी भगवान गोकुळसिंह बयस यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख ३० हजाराची रोकड, २० ग्रॅमची मंगलपोत, ३० ग्रॅमचे किल्लू व इतर किरकोळ दागिने, ३० चांदीची नाणी असा एकूण अडीच लाखाचा ऐवज लंपास केला. तर लोहार गल्लीतील ज्ञानेश्वर माळी यांच्या घरातून ६ ग्रॅम सोने, ९ भार चांदी आणि ५०० रोख असा एकूण साधारण ४० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. ज्या दोन घरांमध्ये चोरी झाली ते दोघेही घरमालक बाहेरगावी गेले होते. दोन्ही घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी दोन्ही बंद घराचे कुलूप अगदी सहज उघडले. यावरून चोरटे सराईत असल्याचे उघड झाल्याचे आहे. चोरट्यांनी आधी महाजन यांच्या घरी चोरी केली.
हे देखील वाचा :
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
- अॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर
- भरधाव कार झाडाला धडकली; रावेरचे तिघे तरुण जागीच ठार
- जळगावत अपघाताची मालिका सुरूच; फुपनगरी फाट्याजवळ भीषण अपघातात दोघे मित्र ठार