⁠ 
शनिवार, मे 18, 2024

उद्यापासून धावणार भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे, भाडे दुप्पट-तिप्पट वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । उद्या सोमवारपासून भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र, या गाडीला मेल, एक्स्प्रेसचा दर्जामुळे भाडे दुप्पट-तिप्पट वाढ करण्यात आली आहे. जळगावसाठी १० रुपयांऐवजी (पूर्वीचे पॅसेंजरचे भाडे) ३० रुपये मोजावे लागतील. भुसावळ ते नाशिकचे भाडे ९५ रुपये लागेल. पूर्वी ते पॅसेंजरला ५० रुपये हाेते. या गाडीचे जनरल तिकीटदेखील प्रवाशांना वेळेवर उपलब्ध होऊ शकेल.

कोरोनानंतर भुसावळ-इगतपुरी या मार्गावर प्रथमच मेमू गाडी सुरू होत आहे. तत्पूर्वी, गेल्या वर्षभरापासून देवळाली शटल अथवा मुंबई पॅसेंजर गाडी सुरू करावी, अशी मागणी वाढली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर ऐवजी मेमू चालवण्याचा निर्णय घेतला. तीदेखील भुसावळ-देवळाली ऐवजी इगतपुरी पर्यंत चालवण्यात येईल. मेमू गाडी सुरू करावी या प्रवाशांच्या मागणीचीदखल घेत मध्यंतरी भुसावळ-बडनेरा व भुसावळ-इटारसी मार्गावर मेमू गाडी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता येत्या १० जानेवारीपासून भुसावळ-इगतपुरी मेमू धावणार आहे. यामुळे नाशिक, कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.

एक मिनिटाचा थांबा
ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी ७ वाजता सुटेल. भादली ७.१३ , जळगाव ७.२४, शिरसोली ७.३४, माहेजी ७.५७, पाचोरा ८.२३, नगरदेवळा ८.५४, कजगाव ९.१४, चाळीसगाव १०.१८, हिरापूर १०.३४, नांदगाव ११.०९, मनमाड ११.४५, नाशिक १.१७, देवळाली १.२९, इगतपुरी ३.१० वाजता पोहोचेल. यामुळे पुढे कल्याण, मुंबईला जाणे सोयीचे होईल. कारण इगतपुरीपासून पुढे कसारा पर्यंत अनेक टॅक्सी धावतात. कसारा तेथून पुढे लाेकलने प्रवास करून मुंबई गाठता येते. दरम्यान, भुसावळ सुटल्यानंतर ज्या ठिकाणी थांबा आहे, त्या स्थानकावर गाडी केवळ एक मिनिट थांबेल.

हे देखील वाचा :