जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । जामनेर शहरातील पाचोरा रोड परिसरातील वर्धमान नगरात बिअरबारचे काम सुरू आहे. नागरी वस्तीत बिअरबारला परवानगी देऊ नये व तत्काळ काम थांबवावे अशी मागणी वर्धमान नगरातील रहिवाशांनी पालिका प्रशासनासह पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली.
शहरातील पाचोरा रोड परिसरातील गट क्रमांक २२८ हा अकृषक झाला असून अनेक नागरिकांनी आपली घरे बांधली आहेत. याच गट नंबरमधील प्लॉट क्रमांक ४१ व ४२ मध्ये बिअर बार सुरु करण्याची परवानगी मागितल्याची माहिती रहिवाशांना मिळाली. त्या दृष्टीने संबंधीत व्यक्तीने बांधकामही सुरू केले आहे. सदरची जागा ही रहिवास प्रयोजनार्थ असतांना त्याचा व्यावसायिक वापर केला जाणार असल्याने हे काम तत्काळ थांबवावे. अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी जामनेर पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार गिरीश महाजन, त्याचप्रमाणे पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालयाचाही याबाबतच्या प्रति देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने दखल घेऊन ही समस्या सोडवावी, अशी अपेक्षा आहे.
हे देखील वाचा :
- चिंता वाढवणारी बातमी! जळगावातील अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळी घटली…
- अत्याचारातून तरुणी राहिली गर्भवती, नंतर.. ; जामनेर तालुक्यातील संतापजनक प्रकार
- जळगाव जिल्हा खुनाच्या घटनेनं पुन्हा हादरला ; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला
- मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार ; जामनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
- अखेर पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल निलंबित ; नेमकं प्रकरण काय?