⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | जळगाव जिल्हा खुनाच्या घटनेनं पुन्हा हादरला ; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला

जळगाव जिल्हा खुनाच्या घटनेनं पुन्हा हादरला ; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२३ । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून खुनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून मुलानेच वयोवृद्ध पित्याचा खून केल्याची घटना समोर आली असून घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नाना बडगुजर (82) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, खून करून पसार झालेला कैलास नाना बडगुजर (56) याला पोलिसांनी शनिवारी रात्री पाचोरा येथून अटक केली.

नेमकी घटना काय
याबाबत असे की, नाना बडगुजर यांचे तरंगवाडी शिवारात शेत आहेत. नाना बडगुजर हे शनिवारी सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत असताना त्यांचा मुलगा कैलास नाना बडगुजर शेतात आला व वडीलांसोबत वाटणी वरून वाद घालू लागला. शाब्दीक वाद वाढत गेल्यानंतर आरोपी कैलासने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या फावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडली तेव्हा आरोपीचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशालने वडिलांनी आजोबाच्या डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेतली. त्याने वडीलांच्या हातुन फावडे हिसकावून जखमी आजोबांना सावरण्याचा प्रयत्न केला मात्रते हालचाल करीत नसल्याचे पाहून आरोपी पसार झाला. आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (33) याने वडिल तथा संशयित कैलास बडगुजर यांच्या विरोधात तक्रार दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.