---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावात तापमान वाढल्यामुळे नारळपाण्याच्या मागणीत वाढ ; नारळपाण्याचे हे फायदे वाचा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । उन्हाळ्यात थंड पेयांसोबतच नारळपाण्याच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. जळगाव शहरात तापमानाचा वाढला असल्याने मोठ्या प्रमाणात नारळपाण्याची विक्री होताना दिसत आहे. शहरात दररोज सुमारे चार हजार शहाळ्यांची विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

naralpani jpg webp

काय आहेत नारळपाण्याचे फायदे
नारळपाणी केवळ तहान भागवत नाही. तर उन्हाळ्याने डिहायड्रेट झालेल्या शरीरात नवी तरतरी आणते. नारळाचे पाणी हृदयासह अवयवांचे संरक्षण करते. नारळाच्या पाण्याच्या सेवनाचा रक्तप्रवाहातील कोलेस्टेरॉल व्यवस्थापनाशी थेट संबंध आहे. रक्तदाबाचे व्यवस्थापन करण्यास नारळ मदत करते. त्यामुळे नारळपाणी दररोज किंवा अधूनमधून प्यायल्यास हृदयाचे दीर्घकाळ संरक्षण होते

---Advertisement---

तापमानामुळे वाढली नारळांची मागणी
जळगाव शहरात मुंबई, कोकण आदी विविध ठिकाणांवरून नारळाची आवक होते. एका आठवड्याला आठ मोठ्या होलसेल व्यापाऱ्यांकडे चार ते पाच ट्रक शहाळे आणले जात आहे. तर उन्हाळा असल्याने नारळ पाण्याची मागणीत ३० टक्के वाढ झाली असून, सुमारे ३५ नारळ पाणीविक्रेते शहरात विविध ठिकाणी व्यवसाय करीत आहेत

किडनी स्टोनचा धोका होतो कमी
नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास किडनी स्टोनचा धोका कमी होण्यास मदत होते. किडनी स्टोन होऊ नये, यासाठी नारळपाणी अत्यंत प्रभावशाली मानले जाते. नारळाच्या पाण्यात मॅग्निजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत होते. शरीरातील व आतड्यांमधील हालचाली नियंत्रित करते. नारळाच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---