⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

अत्याचारातून तरुणी राहिली गर्भवती, नंतर.. ; जामनेर तालुक्यातील संतापजनक प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । जामनेर तालुक्यातून तरुणीवर झालेल्या अत्याचाराची एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 वर्षीय तरुणी कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. शिवाय ही घटना कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा अत्याचार करण्यात आला.

या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिली. पीडीता गर्भवती राहिल्याबाबतची माहिती लपवून ठेवत बेकायदा गर्भपातही करण्यात आल्यानंतर अत्याचार करणार्‍या नराधमासह बेकायदा गर्भपात करणार्‍या डॉक्टरांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना 23 डिसेंबर 2023 च्या सहा महिन्यांपूर्वी घडली. अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिल्यानंतर पीडीतेने ही बाब आईसह भावाला सांगितली मात्र त्यांनी देखील समाजात बदनामी होईल या भीतीने जामनेर तालुक्यातील एका महिला डॉक्टरांच्या रुग्णालयात पीडीतेचा बेकायदा गर्भपात करून घेतला.

याप्रकरणी जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय पंढरीनाथ सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार शेनफडू सोनवणे, पीडीतेची आई, भाऊ तसेच बेकायदा गर्भपात करणार्‍या महिला डॉक्टरांविरोधात पहूर पोसिात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय बनसोड करत आहेत.