अखेर पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल निलंबित ; नेमकं प्रकरण काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२३ । पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ किरण शिंपी यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता सोडून देण्यात आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून ते वाहन पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ अमोल शिंपी यांनी सोमवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री पकडले होते. या वाहनावर कारवाई न करता ते साडून देण्यात आले. या विषयीचा अहवाल पहूर पोलिस ठाण्याकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आला होता.
त्यावर मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कारवाई सुरु करण्यात आली होती. त्यात वरील दोघांनाही निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता काढले. या प्रकरणाची उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे चौकशी देण्यात आली आहे.