माझ्याशी लग्न कर, नाहीतर.. 14 वर्षीय मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२३ । अंगावर ॲसीड फेकून देण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातून समोर आला आहे. याबाबत धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलगीचा गेल्या काही दिवसांपासून हुसेन शहा नाशिर शहा नावाचा मुलगा तिचा पाठलाग करत आहे. दरम्यान, २८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरच्या कालावधीपासून हुसेन हा पिडीत मुलीचा पाठलाग करत आहे. एवढेच नाही तर तिचा पाठलाग करून रस्त्यावर थांबवून “माझ्याशी निकाह कर, तु मला बाजारात भेटत जा, तु जर नाही भेटली तर तोंडावर ॲसीड मारेल, तु जर माझी झाली नाही तर तुला दुसऱ्याचीही होवू देणार नाही” अशी धमकी देत तिचा विनयभंग केला.

हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हुसेन शहा नाशिर शहा याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहे.