जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । रविवार रोजी चोपडा शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक भिडे गुरुजी यांचा मार्गदर्शन मेळावा पार पडला. या मेळाव्यात नागरिक कोरोना नियमांचे पालन करायलाच विसरले आणि त्यामुळे आयोजकांसह ३०० ते ४०० जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
चाेपडा येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात अनेक जण विना मास्क आढळून आले तर याच मेळाव्यात फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन झाले नाही. मेळावा बंदीस्त जागेत त्याचप्रमाणे क्षमतेपेक्षा जास्त जनसमुदाय असल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिस काॅन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांच्या फिर्यादी नुसार जिग्नेश शरद कंखरे, विजय भास्कर वैदकर, गणेश पंढरीनाथ बाविस्कर, विठ्ठल शालिक महाजन, समाधान माळी, महेंद्र भामरे, शुभम महाजन, गोविंदा माळी, नंदू गवळी, हर्षल माळी व आयोजकांसह जवळपास तीनशे ते चारशे जणांवर चाेपडा येथील शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत.
हे देखील वाचा:
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित