⁠ 
सोमवार, मे 20, 2024

जळगावकरांनो आजार अंगावर काढू नका… ७५ टक्के रुग्ण पहिल्या ७२ तासातच मृत्यू पडताय…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप घेत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जळगावला चांगलाच तडाखा दिला आहे. मागील कोरोनापेक्षा यावेळी कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दिव्या मराठीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये ७५% म्हणजे सर्वाधिक मृत्यू हे दाखल झाल्यानंतर ७२ तासांच्या आत झालेले आहेत.

अनेक रुग्ण कोरोनाचे लक्षण दिसून देखील आजारपण अंगावर कढत आहेत. अनेकदा प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यानंतर हे रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहे. यामुळे त्यांच्यावर उपचार होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात दिवसाला जवळपास १० ते १५ मृत्यू कोरोनामुळे होत आहेत.

सर्वाधिक ७२ तासांच्या आत मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या ७५ टक्के आहे. दाखल झाल्यानंतर ६ तासांत मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ११ टक्के आहे तर २४ तासांत मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या २० टक्के आहे. कोरोना संसर्ग वाढल्यानंतर रुग्ण दाखल होत असल्याने त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नाहीये. यामुळे अंगावर आजारकाढू नका, लक्षण दिसतच उपचार सुरु करा असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले आहे.