जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तरुणाकडून गोमांस जप्त करण्यात आले आहे.
यावल तालुक्यातील सावखेडा सीम परिसरात बेकायदेशीरित्या गोमांस विक्री होत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सुचना देवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोकॉ अनिल साळुंखे यांनी गुरूवारी ३० डिसेंबर रोजी कारवाई केली. पथकाने शेख कलीम शेख रशीद (वय-३२) रा.सावखेडा ता.यावल याच्याकडून गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पो.कॉ.अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- चोपड्यात गांजाच्या शेतीचा पर्दाफाश! ४.६७ कोटींचा मुद्देमाल जप्त, संशयित फरार!
- जळके शिवार हादरले! डोक्यात दगड घालून ५५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या..
- इन्स्टाग्रामवर बनावट खाते, भेटण्याचा बहाणा अन् गोळीबार; जखमी सरफराजचा अखेर मृत्यू!
- दिवाळीपूर्वीच जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ! पाण्याच्या मोटारींसह बुलेट लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
- लाच महागात पडणार! जळगाव जि.प.च्या दोघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार





