जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून नेणाऱ्या पॅजो रिक्षाला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यात दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी घडलीय.

सदर अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रूग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. जखमींना जामनेर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

याबाबत असे की, लाकडाने भरलेला ट्रक जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात होता. तर समोरून प्रवाशांनी भरलेली रिक्षा येत होती. गारखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले असून दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून ट्रक देखील रस्त्यावर उलटला असून याचा चालक आणि क्लिनरला देखील दुखापत झाली आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. दरम्यान पोलिसांनी अपघातस्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली आहे. जखमींना जामनेर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
हे देखील वाचा :
- सणासुदीआधी महागाईचा झटका! डिटर्जंट, पेंट्स, टायरपेंटपर्यंत ‘या’ वस्तू महागणार?
- आपत्तीनंतरही सतर्क राहा ; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन
- अण्णाभाऊ साठे यांचे विचार म्हणजे सामाजिक समता आणि स्वाभिमानाची चिरंतन प्रेरणा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात












