यावल आगाराच्या बसवर दगडफेक, सेवा पुन्हा थांबवली

नोव्हेंबर 26, 2021 9:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर हजर राहण्याचे आवाहन केले असता यावल आगरातील १० ते १५ कर्मचारी आज कामावर हजर झाले होते. काही कर्मचाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला असता मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. दगडफेकमुळे बस सेवा पुन्हा ठप्प झाली आहे .

IMG 20211126 WA0090 jpg webp

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्चा आवाहनाला प्रतिसाद देत यावल आगाराचे १० ते १५ कर्मचारी कामावार हजर होवून बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. आगारातील १२ कामगारांना आगार प्रमुख शांताराम भालेराव यांना विभाग नियंत्रण यांच्या नोटिसेच्या संदर्भात रूजू होण्याबाबतचे पत्र दिले असता शुक्रवार दि.२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास यावल आगारातून पंधरा-पंधरा मिनिटांच्या अंतराने जळगावसाठी तीन बसेस सोडण्यात आल्या.

जळगाव-विदगाव-जळगाव बस क्रमांक
एमएच.२०.बीएल ३४७१ यावलपासून चार किलोमीटर लांब वढोदे गावाजवळ सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पोहचली असता काही अज्ञातांनी मोटर सायकलवर येवून बसवर दगड फेक करत काचा फोडल्या. घटनेमुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली असून आगार प्रमुख भालेराव यांनी सदर माहिती यावल पोलीसांना कळवली असता पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रावेरचे पोलीस निरिक्षक तथा यावल प्रभारी कैलाश नागरे व यावलचे पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, विनोद खांडबहाले व पथकासोबत बसेचा पंचनामा करून बस पुन्हा यावल आगारात रवाना केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now