आजचा पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर ; ८ नोव्हेंबर २०२१

नोव्हेंबर 8, 2021 11:08 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (8 नोव्हेंबर) पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जळगावात आज पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे.

petrol diesel

दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

गेल्या दाेन-तीन महिन्यांपूर्वी शंभरी गाठलेल्या पेट्राेलचे दर बुधवारी रात्रीपर्यंत ११७ रुपये ११ पैसे तर डिझेलचे दर १०६ रुपये १८ पैसे हाेते. त्यात केंद्र शासनाने अबकारी शुल्क घटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंधनाचे दर कमी हाेणार असल्याने वाहनधारक काहीअंशी का असेना पण समाधानी आहेत. केंद्र शासनाच्या घाेषणेप्रमाणे जळगावमध्ये गुरुवारी (४ नोव्हेंबर) सकाळी पेट्राेल पंपांवर नवीन दरानुसार विक्री सुरू झाली. पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर विक्री झाले.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now