वरणगावात पुन्हा बायो डिझेलचा साठा पकडला

नोव्हेंबर 1, 2021 12:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । एलसीबी पथकाने वरणगाव येथील निर्मल ढाब्याजवळ सापळा रचुन चौकशी केली असता राज्यात बंदी असलेल्या बायो डिझलेची विक्री होत असल्याचा प्रकार रविवारी रोजी समोर आला आहे. शेख निसार (वय १९, रा. वरणगाव ) हितेश वासुदेव शर्मा ( वय २४, रा. वरणगाव ) सिकंदर खान इस्माईल खान ( वय ५०, रा. मिल्लतनगर, भुसावळ ) असे संशयिताचे नाव असून, पोलिसांनी बायो डिझेलसह  ७ लाख ३७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. व संशयिताविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Untitled design 22 jpg webp

सविस्तर असे की, राज्यात बंदी असलेल्या बायो डिझलेची विक्री होत असल्याचा प्रकार रविवारी पुन्हा समोर आला. एलसीबीने रविवारी पहाटे वरणगावजवळ पुन्हा एकदा बायो डिझेलचा साठा पकडला आहे. यात बायो डिझेलसह साहित्य असा ७ लाख ३७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, अशोक जाधव, ममराज राठोड, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, विठ्ठल फुसे, प्रमे सपकाळे, संजीव मेंढे यांच्या पथकाने रविवारी पहाटे वरणगाव येथील निर्मल ढाब्याजवळ सापळा रचला.

यावेळी तेथे काही तरुण कॅनमध्ये बायो डिझेल घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आत जाऊन चौकशी केली असता तेथे शेख निसार (वय १९, रा. वरणगाव), हितेश वासुदेव शर्मा (वय २४, रा. वरणगाव), सिकंदर खान इस्माईल खान (वय ५०, रा. मिल्लतनगर, भुसावळ) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणावरुन पोलिसांनी २ लाख ३५ हजार २०० रुपयांचे बायो डिझेलसह एकूण ७ लाख ३७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयिताविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now