बंद घर फोडत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज लांबवला; गुन्हा दाखल

ऑक्टोबर 27, 2021 2:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ येथील हनुमान नगर परिसरातील  बंद घर फोडत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार २७ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी वारके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात  येथील बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

सविस्तर असे की, भुसावळ येथील हनुमान नगर परिसरातील  बंद घर फोडत चोरट्यांनी १८ हजारांचा ऐवज लांबवला. भूषण बाळकृष्ण वारके ( वय- 33, हनुमान नगर, भुसावळ) हे मार्केटींग व्यवसाय करतात. त्यांच्या शेजारी काका अशोक नामदेव वारके हे राहतात. 20 ऑक्टोबर रोजी ते मुलाला भेटण्यासाठी पुण्यात गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. २७ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास वारके यांना जाग आल्यानंतर त्यांना काका अशोक वारके यांच्या घराजवळ एक संशयीत इसम उभा असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी धाव घेतल्यानंतर संशयीत इसम पसार झाला तर घराची पाहणी केली.

दरम्यान, दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटल्याचे दिसल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आला. चोरट्यांनी स्टीलच्या पेट्यांमध्ये ठेवलेली 17 हजारांची रोकड व एक हजार रुपये किंमतीचे चांदीचे नाणे लांबवल्याने या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश पाटील करीत आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now