राज्य शासनाचे १० हजार कोटींचे अर्थसहाय्य पॅकेज जाहीर, नुकसानग्रस्तांना मिळणार दिलासा

ऑक्टोबर 14, 2021 12:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य्   ( पॅकेज ) जाहीर करण्याचा निर्णय आज आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

mantri jpg webp

मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या पॅकेजची मंत्रिमंडळ बैठेंकीत घोषणा केली. असल्याने राज्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या आढावा घेण्यात आला असून, यात पुरामुळे ५५ लाख हेक्टहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन. डी. आर. एफ च्य निकषांची  वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसाह्य ( पॅकेज ) जाहीर करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठेंकीत करण्यात आला आहे.

यात जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेकटर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेकटर , बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति  हेकटर अशी मदत असणार आहे हि मदत २ हेकटर क्षेत्रापर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now