विद्युत पंपाची पीन काढताना शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

ऑक्टोबर 6, 2021 12:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । पिन काढताना ३२ वर्षीय विवाहितेला विजेचा शॉक लागला. या घटनेत विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे घडली. वैशाली संतोष कोळी असे मृत विवाहितेचे नाव आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात असून मारवड पाेलिसांत नाेंद करण्यात आली आहे.

New Project 3 jpg webp

याबाबत असे कि,  गावात पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर वैशाली कोळी यांनी पंप सुरू केला. वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांनी पंपाची पिन काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक वीज आल्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेनंतर त्या जागीच कोसळल्या. ही घटना शेजारील महिलांच्या लक्षात आली. त्यानंतर तरुणांनी महिलेला खासगी रुग्णालयात हलवले.

तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.जी.एम.पाटील यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. मृत विवाहितेच्या पश्चात सासू, सासरे, पती, दीर, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्या पाणीपुरवठा कर्मचारी सुखदेव कोळी यांच्या सून, तर पाडळसरे धरणावरील वीज कर्मचारी संतोष कोळी यांच्या पत्नी होत. मारवड पाेलिसांत नाेंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now