चोपड्यात पत्नीवर विळ्याने वार करून खून

सप्टेंबर 6, 2021 8:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । चोपडा येथे  कौंटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार करून खून केल्याची घटना घडली. संजय पुंजू चव्हाण (वय ४८) असे संशयित पतीचे नाव असून पत्नी मीराबाई चव्हाण मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, याबाबत शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

याबाबात असे की, शहरातल्या फुले नगरातील रहिवासी संजय चव्हाण याचे रविवारी सायंकाळी पत्नी मीराबाई चव्हाण हिच्यासोबत वादातून भांडण झाले. याप्रसंगी त्याने संतापात आपल्या पत्नीवर विळ्याने वार केले. यामुळे तिच्या मांडीला जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाले.

जखमी अवस्थेत मीराबाई चव्हाण यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मीराबाईंचा मृत्यू झाला. संबंधीत प्रकरणी या दाम्पत्याचा मुलगा सागर चव्हाण याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now