५ लाखांसाठी विवाहितेचा छळ, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

ऑगस्ट 22, 2021 9:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल प्रतिनिधी । नोकरीसाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी यावल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्यांविरोधात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

husband-torture-wife

सविस्तर माहिती अशी की, माधुरी भुषण फुसे (वय-२८) रा. नेहरू नगर, रामानंद नगरजवळ ह.मु. मेन रोड यावल यांचा विवाह जळगाव येथील भुषण यशवंत फुसे यांच्याशी ३० मार्च २०१९ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच पती भुषण यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर पती भुषण याला नोकरी लागण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी मारझोड करण्यास सुरूवात केली. लग्नाला वर्ष झाल्यानंतर मुलबाळ होत नाही म्हणून सासरे यशवंत फकीरा फुसे, सासु सुमित्रा यशवंत फुसे, ननंद पुनम हितेंद्र असवाल आणि नंदोई हितेंद्र भगवान आसवाल सर्व रा. नेहरू नगर जळगाव यांनी गांजपाठ केला. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता यावल येथे माहेरी निघून आल्यात. यावल पोलीसात धाव घेवून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात पती भुषण फुसे, यशवंत फुसे, सासु सुमित्रा फुसे, ननंद पुनम असवाल आणि नंदोई हितेंद्र आसवाल यांच्याविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now