सलग तिसऱ्या दिवशी डिझेल झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे भाव

ऑगस्ट 20, 2021 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी डिझेल दरात कपात केली आहे. मात्र पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. आज शुक्रवारी डिझेल १५ ते २० पैशांनी स्वस्त झालं आहे. डिझेल दर कपातीने माल वाहतूकदारांना किंचित दिलासा मिळाला आहे.

petrol diesel

दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.३३ रुपये इतका झाला आहे.

मागील दोन महिन्यात कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक शहरात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली. डिझेल शंभरीच्या नजीक पोहोचले आहे. या दरवाढीने सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, कंपन्यांनी बुधवारी तब्बल चार महिन्यानंतर डिझेलचा भाव कमी केला होता. त्यानंतर काल गुरुवारी देखील डिझेल २० पैशांनी स्वस्त केले होते. आज पुन्हा एकदा कंपन्यांनी डिझेलमध्ये २० पैशांची कपात केली. तीन सत्रात डिझेल ६० पैशांनी स्वस्त झाले आहे. तर पेट्रोलचा भाव सलग ३४ व्या दिवशी स्थिर आहे.

जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १६ रूपयेपर्यंत तर डिझेलचे १४ रूपये प्रति लिटर वाढले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now