---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

देसाई साहेब, तुमच्या दौऱ्याने त्यांच्या ‘पोटपाणी’वर गदा!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । युवकांचे प्रेरणास्थान, शिवसेना युवासेना सचिव वरूण देसाई गुरुवारी जळगाव दौऱ्यावर आले आहेत. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी दुपारी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या पोटापाण्यावर गदा आली आहे. प्रशासनाकडून आज विक्रेत्यांना दुकानेच थाटण्यास मनाई करण्यात आली आहे. नेता जनतेसाठी असतो जनतेचा रोजगार हिरावण्यासाठी नव्हे अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

Untitled design 1 1

युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई आज जळगाव शहरात आले आहे. ते दिवसभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून दुपारी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात त्यांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्यांच्या स्वागतार्ह चमकोगिरी करण्यासाठी नाट्यगृह परिसरात आणि शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मनपाला त्यातून किती उत्पन्न मिळाले हा संशोधनाचा भाग आहे. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाच्या बाहेर दररोज भाजीपाला विक्रेते दुकान मांडून बसतात. वरूण सरदेसाई यांचा दौरा असल्याने आज विक्रेत्यांना दुकान थाटण्यास मनाई करण्यात आली आहे. नेत्यांच्या आगमनामुळे प्रशासनाकडून करण्यात आलेली ही सूचना म्हणजे हुकूमशाहीचाच प्रत्यय येतो. संभाजी नाट्यगृहाजवळ परिसरातील नागरिक रोज सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. सकाळी ताजा भाजीपाला मिळत असल्याने नागरिकांची गर्दी होत असते परंतु आज सकाळी त्या ठिकाणी आल्यानंतर वेगळेच चित्र दिसले ने नागरिकांचा भ्रमनिरास झाला. काही विक्रेत्यांनी आणलेला भाजीपाला पुन्हा घरी घेऊन जावा लागला किंवा इतरत्र विक्रीसाठी बसावे लागले. कदाचित दुपारी दौरा आटोपल्यानंतर भाजीपाला विक्रेते पुन्हा दुकान थाटतील.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---