जळगाव शहर

मनियार बिरादरीने फुलविले १० संसार, ४ तलाक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्हा मनियार बिरादरी मार्फत सुरू असलेल्या तडजोड समितीच्या माध्यमाने पती-पत्नीमधील वैवाहीक वाद सोडवले जात असून लॉक डाऊन च्या जून व जुलै २०२१ महिन्यातील ६० दिवसात एकूण २० प्रकरणे  नोंदली गेली त्यातील १५ प्रकरणात अंतिम कारवाई करण्यात आली त्यात पती-पत्नीच्या आपसातील समझोता करारानुसार ४ तलाक करण्यात आले, तर एका प्रकरणी पत्नीने पतीपासून विभक्त होण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने तिला खूलअ ( विभक्त) देण्यात आले, तर १० वैवाहिक जोडप्यांचा  अटी – शर्ती सह करार नामा करून त्यांना पुनश्च आपले वैवाहिक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. अशाप्रकारे २० प्रकरणातून १५ प्रकरणी अंतिम निर्णय झाला व ५  प्रकरण प्रगतीपथावर आहेत.

जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व तडजोड समितीचे अध्यक्ष सय्यद चांद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

 सर्व बिरादरीचे प्रकरणे हाताळणारी एकमेव महाराष्ट्रातील मानियार बिरादरी

जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील व खास करून महाराष्ट्रातील संपूर्ण ३६ जिल्ह्यांमधून विविध बिरादरीचे वैवाहिक वादाची प्रकरणे जळगाव जिल्हा मनियार बिरादरी कडे येत असतात व बिरादरी च्या माध्यमाने ती सोडवली जातात महाराष्ट्रात जळगाव जळगाव जिल्हा मानियार बिरादरी अशी एकमेव बिरादरी आहे जी सर्व बिरादरीचे प्रकरणे हाताळीत असून त्यात त्यांना यश मिळत आहे. बिरादरी कडे आतापावेतो २२३२ प्रकरणाची नोंद झालेली आहे.

तडजोड समिती

फारूक शेख, सैयद चांद,हारून शेख,सलीम मोहम्मद, ताहेर शेख,अब्दुल रउफ,अल्ताफ शेख,इकबाल वजीर,सादिक मुसा हे सदस्य असून ते सदर तडजोड करीत असतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button