मनपाचा प्लास्टिक विक्रेत्यांना दणका : ५ लाखांचा दंड वसूल

जुलै 29, 2021 3:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । राज्यात प्लास्टिक बंदी मोहिम राबविली जात असली तरी अनेक ठिकाणी सर्रास पद्धतीने प्लास्टिक विक्री केली जात असल्याचे दिसून येतेय. दरम्यान, जळगाव शहरात देखील अनेक विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा प्लास्टिक विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई करत गेल्या सहा महिन्यात एकूण ४ लाख ७५ हजार ६२० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

plastik jpg webp

जळगाव मनपाच्या आरोग्य विभागातर्फे नुकतीच एका प्लास्टिकच्या होलसेल दुकानावर मोठी कारवाई करत तिथून तीन ट्रॅक्टर भरून प्लास्टिक जप्त करण्यात आले. मनपाने केलेल्या या कारवाईमुळे शहरात रितू प्लास्टिक विकण्यासाठी धजावत आहेत. प्लास्टिक वर महापालिकेने कारवाई केली यानंतर नागरिक धजावले ही गोष्ट जरी खरी असली तरी नागरिकांनी ही गोष्ट ध्यानी धरायला हवी की, प्लास्टिकमुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे व त्यासाठी आपण प्लास्टिक वापरायला नको.

शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक्के बंदी झाल्याचे चित्र गैरमार्गाने होत असलेल्या वापरावरून स्पष्ट होते. अनेकदा भाजीविक्रेते व अन्य व्यवसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत दिसून येत आहे.

दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या सहा महिन्यात २६७ जणांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ४ लाख ७५ हजार ६२० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नागरिकांनी प्लास्टिकचा वापर बंद करायला हवा कारण यामुळे प्रदूषण होते हे सर्वांनाच माहीत आहे. याच बरोबर जर कोणी अवैधरित्या प्लास्टिकची विक्री करत असेल तर तात्काळ ती माहिती महानगरपालिके पर्यंत पोहोचवावी.
-पवन पाटील, सहआयुक्त 

जळगाव शहरातील नागरिकांनी से नो टू प्लास्टिक मोहीम हाती घ्यायला हवी. प्लास्टिक वर बंदी आणणं ही ज्या प्रकारे महानगरपालिकेचे जबाबदारी आहे त्याच प्रकारे प्लास्टिक न वापरणे ही नागरिकांची जबाबदारी आहे कारण प्लास्टिक हे सर्वांसाठीच हानिकारक आहे.

– सतीश कुलकर्णी, आयुक्त 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now