जळगाव शहरात ‘या’ पाच केंद्रांवर आज होणार लसीकरण

जुलै 26, 2021 9:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ ।  शहरात दोन दिवसांच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा लस उपलब्ध होत आहे. महापालिकेच्या पाच केंद्रांसह सहा शासकीय केंद्रांवर लस मिळेल. यातील पालिकेच्या चेतनदास मेहता या केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस असणार आहे. 

vaccine

या पाच केंद्रांवर होणार लसीकरण

सोमवारी महापालिकेच्या डी.बी. जैन, शाहू रुग्णालय, मनपा शाळा क्रमांक ४८ व का. ऊ. कोल्हे विद्यालय या चार केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थींना कोविशील्डचा दुसरा डोस मिळेल. तर चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस मिळतील. रेडक्रॉस केंद्रावरही १८ वर्षांवरील लाभार्थींना दुसरा डोस मिळणार.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now