बंडखोर नगरसेवक खुलासा सादर करणार

जुलै 20, 2021 11:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ ।  मार्च महिन्यात झालेल्या महापौर निवडीवेळी भाजपाचा व्हीप झुगारत शिवसेनेच्या उमेदवारास मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अपात्रतेची नोटीस बजावली आहे. दरम्यान, या दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर बंडखोर नगरसेवक २३ जुलै रोजी आपली बाजू विभागीय आयुक्तांकडे मांडणार आहेत. २७ नगरसेवकांनी यासाठी वकिलाची नियुक्तीदेखील केली असून, वकिलांमार्फत नगरसेवक आपला खुलासा सादर करणार आहेत.

jalgaon manapa

याबाबत असे की, जळगाव महापालिकेत महापौर निवडीच्‍यावेळी सत्‍तांतर झाले. एकहाती सत्‍ता मिळविलेल्‍या भाजपच्‍या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिल्‍याने महापालिकेवर भगवा फडकला होता. त्यामुळे भाजपने २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील केले. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे.

यात सर्व बंडखोर हजर झाले असून, त्यांनी मुदत मागितली होती. त्यानुसार २३ जुलै रोजी २७ नगरसेवकांना बाजू मांडण्यासाठी मुदत दिली आहे. त्यात नगरसेवकांच्या वतीने नाशिक येथील वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच खुलासा देखील सादर केला जाणार आहे. दरम्यान, भाजपने व्हीप मोडल्याचा आरोप केला आहे; परंतु २७ पैकी एकालाही प्रत्यक्ष व्हीप मिळाला नसून, एकाचीही स्वाक्षरी नसल्याचा दावा बंडखोरांकडून केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now