तेली समाजाच्या वधू-वर सूची पुस्तिका अर्जाचं लोकार्पण

जुलै 19, 2021 3:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । राज्यातील तेली समाजाच्या वधू- वर परिचय पुस्तिकेच्या फोर्मचे लोकार्पण पत्रकार संघाच्या सभागृहात मान्यवर व समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात बहुसंख्य तेली समाज व्यापलेला असून विवाह बंधन जुडण्याकरिता तेली समाजातील बांधवांनी विवाह करण्यास इच्छुक पाल्याचा परिचय या पुस्तिकेत देण्याचे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी समाज बंधू – भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. 

teli vadhu var melava

विवाह माहिती होणार प्रसारित 

महाराष्ट्रात बहुसंख्य तेली समाज असून उद्योग व्यवसायात तसेच विविध क्षेत्रात स्थिरावलेला आहे. यामुळे इतर जिल्ह्यातील व राज्यातील समाज बांधवांना आपल्या पाल्याचा विवाह करण्यास सोईचे होईल अशी पुस्तिका तयार करण्यात येणार आहे, यामुळे समाज एकत्रित करण्याचा उद्देश साध्य होणार असून अनेक वधू व वराचा परिचय सहज उपलब्ध होणार आहे. मध्यप्रदेश, गुजरात  याभागातील तेली समाज बांधव देखील मोठ्या प्रमाणात विवाह इच्छुक नोंदणी करतात हे विशेष.

दोन वर्षाचा आपत्ती काळ 

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोना या संकटाने घेरले असताना अनेक समाज उपयोगी जाहीर कार्यक्रम आयोजित करता आले, राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन म्हणून दोन वर्षात समाज एकत्रित झालेला नाही मात्र कोरोनाचे संकट काही प्रमाणात निर्वंळ ले असताना प्रथमच वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

यांची होती उपस्थिती 

कार्यक्रमामध्ये मान्यवर महाराष्ट्र प्रांतिक तेली सभा जिल्हाध्यक्ष के.डी. पाटील, रामचंद्र चौधरी, उद्योजक संतोष चौधरी, विजय चौधरी, डॉ मणीलाल चौधरी, व्ही आर पाटील, डी. ओ. चौधरी शोभा चौधरी, निर्मला चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now