सफाई कामगार व कुटूंबियांसाठी कर्ज योजना ; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जुलै 15, 2021 2:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (म.) जळगाव या कार्यालयामार्फत सफाई कर्मचारी/सफाई कर्मचारी कुटूंबातील अवलंबीत लाभार्थ्यासाठी जिल्हा कार्यालयात प्रलंबित कर्ज प्रकरणांसाठी योजना राबविण्यात येणार आहे. अशी माहिती के. जी. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जळगाव यांनी दिली आहे.  

महामंडळाच्या 43 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 14 ते 30 जुलै, 2021 या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महामंडळाच्या mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे. असेही श्री. जोपळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now