जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । भाजपचे काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ होताच शिवसेनेने महापौर पदासाठी अर्ज दाखल करून निवडणुकीत धमाल आणली आहे. शिवसेनेतर्फे जयश्री सुनील महाजन यांनी अर्ज दाखल केला असून पक्षातर्फे व्हीप देखील जाहीर करण्यात आला आहे.
महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक १८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. सुरवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत आता रंगत आली असून यामागे एकनाथ खडसे असल्याची चर्चा जळगावात सुरु झाली आहे. आता या निवडणुकीचा काय निकाल येतो यावर बरेच काही आवलंबून आहे. एकप्रकारे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह आ. राजूमामा भोळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हे देखील वाचा : नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
जयश्री महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना माजी महापौर नितीन लढ्ढा, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे, महानगराध्यक्ष शरद तायडे, इब्राहिम पटेल, प्रशांत नाईक, नितीन सपके, चेतन शिरसाळे आदींची उपस्थिती होती.
हे देखील वाचा : गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !