Amalner : अमळनेरात मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले ; जळगाव-सुरत मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत

मे 15, 2025 3:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे रेल्वे मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना आज १५ रोजी घडली. या अपघातामुळे जळगाव-सुरत या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नेमका अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

amalner railway accident

मिळालेल्या माहितीनुसार भुसावळकडून नंदुरबारकडे कोयला घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे ५ ते ६ डब्बे रुळावरून घसरले. ही घन आज अमळनेरातील प्रताप महाविद्यालयाजवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून रेल्वे चे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत.

डब्बे खाली पडल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत- भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ज्यामुळे रेल्वेच्या प्रवाश्यांचे हाल होणार आहेत. स्टेशन पासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्ती कामाला सुरुवात केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नेमका अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment