नोकरी संधी

भारतीय कृषी संशोधन परिषदेत तब्बल 1393 पदांसाठी भरती; वेतन 112400 पर्यंत, पात्रता काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद विविध पदांसाठी तब्बल 1,393 जागांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 डिसेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. ASRB ICAR Bharti

कोणती पदे भरली जाणार आहे?

या भरतीमध्ये टेक्निकल असिस्टंट (T-3) पदाच्या 1,254 जागा, तर सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) पदाच्या 139 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने सरकारी नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

शैक्षणिक पात्रता

टेक्निकल असिस्टंट आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट या पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन, संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयांतील पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.

याशिवाय B.V.Sc. & A.H. आणि B.F.Sc. पदवीधारकांनाही संधी देण्यात आली आहे. सिव्हिल, कृषी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी, फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र आहेत.

तसेच माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील B.E./B.Tech. पदवीधारक उमेदवारांनाही संबंधित कार्यात्मक गट किंवा उपगटाच्या आवश्यकतेनुसार अर्ज करता येणार आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय 17 डिसेंबर 2026 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण (GEN), OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 300 रुपये आहे. तर SC, ST, माजी सैनिक (ExSM), महिला आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

किती पगार मिळेल?

७ व्या वेतन आयोगानुसार टेक्निकल असिस्टंट पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹२९,२०० ते ₹९२,३०० पर्यंत वेतन मिळेल. सिनियर टेक्निकल असिस्टंट पदांसाठी वेतनश्रेणी ₹३५,४०० ते ₹१,१२,४०० निश्चित करण्यात आली आहे.

अर्जाची अंतिम मुदत

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा 18 ते 20 डिसेंबर 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. या भरतीची पूर्व परीक्षा जानेवारी 2027 मध्ये होणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, प्रवर्गनिहाय सवलत आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button